SONALI
SAHARE
THE
BEST
POETESS

Talash Sirf sukoon ki hoti hai ,
Nam rishte ka chahe Jo bhi Ho....

My first collection of poems is dedicated to my elder brother film director Harshad Marotrao Raipure. I am happy and sad to offer him this collection of poems. If he was there, I would happily give it to him. Time has snatched him from us. A beautiful personality, all quality. He always inspired us because he is older. I learned from him how important is determination, hard work in life. A boy from "Yevli " village in Gadchiroli district became a film director. When it was time to do something he had no time. He is always with us. He has not gone far from our thoughts. He is the favorite of all in our Raipure family. He will always be missed by us. He is always in our thoughts and motivates us,

CERTIFICATES

More info..

Read More

More info..

Read More

More info..

Read More

More info..

Read More

More info..

Read More

More info..

Read More

About UsI am Sonali Sahare From Nagpur
Born: 23/7/1978 Mulgaon: At. Po. Yevli, Ta. Dist. Gadchiroli.
Teaching: M.A. (Marathi Literature.) B.Ed. E-mail: sonalisahare06@gmail.com Father: Famous social worker Dr. M. A. Raipure, Gadchiroli.
Post held 1) Member at Avishkar Sahitya Manch, Bramhapuri.
2) Member at Jadiboli Sahitya Manch, Bramhapuri.
3) Lifelong member Marathi Shiledar Multipurpose Organization, Nagpur


This is my Some Poems

LIFE IS LIKE A AMAZING JOURNEY

This is my Some Poems

आयुष्याचे जीवनचक्र

हृदयाच्या गाभाऱ्यात
किती आठवणींचा पसारा
मन होता........ व्याकूळ
वाटे स्पदंनाचा सहारा


लोचनातील.... भाव
कसे पापण्यात दडले
अश्रू विना ही ..डोळे
मूक होवूनी अतंरी रडले


सुखाचे क्षण..........येता
हसू ओठावर फुलले
हसण्या पूर्वी त्यांनीही
कित्येक वार दुःखाचे झेलले


दुःखाच्या ढिगार्‍यात
सुख इवलेसे हरविले
इवल्याशा... सुखातून
आनंदाचे मळे फुलविले


आयुष्याचे जीवनचक्र
अविरत सुरू असते
प्रत्येक चक्रातून गेल्यावर
जीवनाचे खरे सार कळते.

स्पर्धेकरीता कविता

विविध धर्मानी नटलेला
भारत माझा देश!!
वेगवेगळ्या प्रातांतील
भारतात वेगवेगळे वेश!!


लोकशाही नादंते
आपल्या भारत देशात!!
सुख शांती समाधान असावे
प्रत्येकांच्या मनात!!


वेगवेगळ्या बोलीभाषेत
माझा देश शोभून दिसे !!
थोड्या थोड्या अंतरावर
बोलीभाषेत बदल असे!!


संविधानाच्या पानावर लिहीले
सर्वांस समानतेचे अधिकार!!
गुण्यागोविंदाने नांदावे
आहेत बाबासाहेबांचे उपकार!!


भारत माझा देश
नकाशावर शोभून दिसे!!
एकजुटीने असावे सारे
हिचं अमुच्या तिरंग्याची शान असे!!

एक तरी झाड लावू

खुप छान आहे मित्रांनो
आपल्या शाळेचे पटांगण
हिरवी हिरवी झाडे लावू
सुरेख दिसेलं निळे गगन

शाळेमध्ये लावूया
आयुर्वेदिक औषधिची झाडे
प्राणवायू भरपूर देतील
तब्येतीत सुधारणा पडे

रंगीत रंगीत फुल बागेत
आपण सर्व मित्र मिळून फिरू
मनसोक्त सवंगड्यांशी खेळतांना
एकमेकांचे हात हातात धरू

बघा रंगीत नक्षीदार फुलपाखरू
कशी झाडावर बसली
साऱ्या मुलांच्या नजरा मग
त्यांच्याकडे वळली

रोज झाडांना पाणी घाला
शाळेत गुरुजी ने आम्हा शिकवीले
मग प्रत्येक मुलांनी आपले कर्तव्य
झाडा प्रती जागविले

फळे येति गोड गोमटी
सर्वांना पोष्टिक खायला मिळेल
झाडांचे महत्त्व काय असते
हे सार्‍या मुलांनाही कळेल.

नातं प्रेमाचं

कुठून कसे, दूरचे, जवळचे
जुळतात हे ऋणानुबंध
असतो मग त्या नात्यास
घमघमणारा प्रेमळ सुगंध

नाती खूप मौल्यवान असतात
ते खूप जपून ठेवायचे
वाटलीस कधी गरज आपली तर
मग मदतीसाठी धावून जायचे

नातं हे कुठलेचं असो
ते अगदी विश्वासाने जपायचे
मायेची ऊब देऊन
त्या नात्यास फुलासारखे फुलवायचे

होतात कधी चूकीचे गैरसमज नात्यात
परत त्या नात्यास एक संधी द्यायची
हरवलेल्या त्या नात्यात
मग परत नव्याने भेट द्यायची

नदीच्या वाहत्या पाण्यासारखी
नाती स्वच्छ नितळ असावी
प्रत्येक नाती ही मानवाने
अगदी प्रेमाने जपावी.

रंग कोणता

रंग कोणता सांग
तुझ्या रे मनाचा
असती विविध रंग
रंग कोणता तुझ्या आवडीचा

आवडतो तुला रंग तो गुलाबी
गुलाब करतो प्रेमाची बरोबरी....

आवडतो तुला रंग आकाशी
तुझ्या मनाची तुलना त्या विस्तीर्ण नभाशी......

आवडतो तुला रंगतो पांढरा
म्हणूनचं असते तुझी वैचारिक साधना......

आवडतो तुला रंग केशरी
त्यागाचा आहेस तूचं खरा मानकरी......

आवडतो तुला रंग तो हिरवा
असे त्यात चैतन्य ,उत्साहाचा ठेवा

किती सांगू तुझ्या आवडीचे
प्रेमाचे सर्व रंग घेवून
तू असतोस आता माझ्या संग

MORE INFORMATION

प्रत्यक्ष सहभाग


१) जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामडंळ द्वारा आयोजित पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य सम्मेलन, चिमूर जि. चंद्रपूर २) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूरतर्फे आयोजित 'भेट मराठी मनाची राज्यस्तरीय कविसम्मेलनात प्रत्यक्ष सहभाग. ३) अविष्कार साहित्य मंच, ब्रम्हपुरी कविसम्मेलनात सहभाग. ४) झाडीबोली साहित्य मंच, चिमूर कविसम्मेलनात सहभाग. ५) झाडीबोली साहित्य मंचद्वारे हास्य कविसम्मेलनात सहभाग. ६) महाविद्यालयीन काळात विविध कविसम्मेलनात सहभाग.

मिळालेले पुरस्कार :

१) जागतिक आंबेडकरी साहित्य महामडंळद्वारा आयोजित पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य सम्मेलनात माझ्या 'कोडंवाडा या कवितेस सन्मानचिन्ह व सन्मानपत्र. २) मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे आयोजित पाऊलखुणा राज्यस्तरीय कवी संमेलन अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया येथे प्रत्यक्ष सहभाग सन्मानपत्र. ३) बेरार टाईम्स, गोंदिया या वृत्तपत्रात अनेक कविता प्रकाशित. ४) भारतीय बौध्द महासभा गडचिरोली 'धम्म संदेश' विशेषांकात अनेक कविता प्रकाशित.

SOME ARTICLES

विषय-मोहर पाचूच्या पानाचा


पानगळ संपताचं
झाडांना येते नव पालवी
फांद्या फुलांनी ते झाड बहरून
देतात आम्हा सावली

अ sss किती सुरेख अप्रतिम कलाकुसर ही निसर्गाची... एकामागून एक ऋतू हे बदलत जातात.... आयुष्याचे जीवनगाणे आनंदाने ते गातात. पानझळ सुरु झाली की, एकदा नक्कीचं रानातून फेरफटका मारुन पानगळ चा.... आस्वाद घ्यावा.. बहुतांशी याकडे सर्व दुर्लक्ष करतात... सर्वांना हिरवेकंच रानचं आवडते. पण पानगळ झाले की, सभोवताली पाने पसरलेली असतात. कधी वारा येताचं ती उडतात... Read More

विषय - ही गुलाबी हवा


स्पर्शुनी मज जाते
थंडगार गुलाबी हवा
प्रत्येक वेळेस थंड गारवा
वाटे मनास नवा नवा
ही गुलाबी हवा.......

सौंदर्य काय असतं हे जाणून घ्यायचं असेल तर पहिल्या प्रहरी निसर्गाच्या सानिध्यात नक्कीचं फिरून यावे. सकाळचे वातावरणचं खूप मस्त असते . त्या आल्हाददायक वातावरणात मन प्रसन्न होतं. अशा वेळेस टेकडीवर चढून सौंदर्य बघण्यात खूप मजा असते. ते निळेशार आकाश..... जणू आकाशाने आपल्यास कवेत घेतले आहे..... तो पक्षांचा आवाज.... हवेच्या स्पर्शाने होणारी ती पानांची सळसळ.... Read More

.

विषय - शिल्पकार


शिल्पकार तू लेणी कोरणारा
लेणीतही मूर्ती कोरनारा
मूर्तीतही ह्रुदय कोरणारा
हृदय कोरतांना त्या संवेदना झेलणारा..

शिल्पकार म्हणजे एक जादूगर. तो आपल्या जादूने दगडासही आकार देतो. एका साध्या दगडास मूर्तीचे रूप देवून मंदिरात त्याची स्थापना करतो.तो आपल्या कलाकौशल्याने कधी स्त्रीचे सौंदर्य रेखाटतो....तर कधी मोठमोठ्या राजवाड्यात भिंतीवर तो आपली कला कोरतो.... दगडात जिवंतपणा ओततो तो शिल्पकार..... दगडी भिंतीस घरपण आणतो तो शिल्पकार..... Read More

Contact us

Please fill up the below form with your feedback/ queries to help us serve you better.

SONALI  SAHARE

Brahmapuri District,
,
Chandrapur,


Email id Sonalisahare06@gmail.com
View on Google Maps
Our Website Is Fully Responsive - Compatibility - Latest Version of Mozilla Firefox , Internet Explorer , Google Crome, Android , & IOS .
The Web Sonali Sahare